Notice Pudhari
मुंबई

BMC Water Connection: मुंबईत मशिदीची अनधिकृत जलजोडणी रडारवर! विमानतळ प्राधिकरणाला महापालिकेची नोटीस

मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या भूखंडावरील मशिदीला १५ मिमी जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत असल्याचे BMCच्या पाहणीत आढळले. या जलजोडणीची जल अभियंता खात्याकडे नोंद नसल्याने विमानतळ प्राधिकरणाला ७ दिवसांत माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या भूखंडावर असलेल्या मशिदीने परस्पर अनधिकृत जलजोडणी घेतल्याचे उघडकीस आले आहे. या जलजोडणीबाबत पालिकेच्या जल अभियंता खात्याकडे नोंदच नाही.

त्यामुळे या जलजोडणीबाबत विमानतळ प्राधिकरणाला कळवण्यात आले असून ७ दिवसात याची माहिती उपलब्ध करून द्यावी. अन्यथा महापालिका जलजोडणी खंडित करेल, असा इशारा दिला आहे.

जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलजवळ, विमानतळाच्या टर्मिनल २ जवळील मशिदीला दिलेल्या अनधिकृत जलजोडणीकडे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेच्या अंधेरी के-दक्षिण विभागातील जल अभियंता खात्याचे लक्ष वेधले होते.

त्यानुसार या खात्याच्या अभियंत्यांनी जागेची जाऊन पाहणी केली. यावेळी मशिदीला १५ मिमी व्यासाच्या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सहाय्यक अभियंता यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे जल जोडणीबाबत माहिती विचारली आहे.

विमानतळ प्राधिकरणाने या जलवाहिनीची माहिती घेऊन, ही जलजोडणी अनधिकृत असल्याचे आढळून आल्यास त्वरित खंडित करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT