Mumbai 1BHK Rent Pudhari
मुंबई

Mumbai 1BHK Rent: मुंबईत ‌‘वन बीएचके‌’ घराची भाडीही अवाक्याबाहेर

मुंबईत आता वन बीएचके भाड्याने घ्यायलाही परवडत नाही, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: 2026 चे अर्धे वर्ष सरत आले असताना मुंबईच्या बहुतांश प्रमुख वस्त्यांमधील वन बीएचके म्हणजेच ‌‘बेडरूम-हॉल-किचन अशा छोटेखानी घरांचे भाडे आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. रियालिटी नेक्स्टच्या इस्टा पोस्टनुसार भांडुपमधील वन बीएचकेचे भाडे 28 हजार रूपये आहे, तर एवढ्याच जागेसाठी कुलाब्यात महिन्याला एक लाखांच्याही पुढे भाडे मोजावे लागत आहे.

जागांना असलेली प्रचंड मागणी, घराजवळ असलेली प्रवासाची साधने आणि जरा चांगली लोकवस्ती यावर वन बीएचके घरांची भाडी कमी-जास्त होतात.

याच निकषावर अनेक भागांत मालकांनी भाडी भडकवून ठेवली आहेत. त्यात प्रामुख्याने वांद्रे, परळ, प्रभादेवी, मरिन लाईन्स आणि दादरसारख्या भागांचा समावेश होतो. या वस्त्यांमध्ये चांगल्या घरांची भाडी सतत वाढत आहेत. आता तर अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मुलुंड आणि कांदिवलीतही घरांची भाडी वाढू लागली आहेत.

मुंबईत उत्पन्नवाढीचे प्रमाण आणि घरांची भाडी वाढण्याचे प्रमाण मात्र जुळत नाही. त्यामुळे मुंबईचे भाडोत्री घरांचे मार्केट आवाक्याबाहेर गेल्याची मध्यमवर्गाची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. मुंबईत आता वन बीएचके भाड्याने घ्यायलाही परवडत नाही, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT