Mulund Metro Pillar Slab Collapse 
मुंबई

Mulund Metro Pillar Slab Collapse: मुलुंड मेट्रो दुर्घटना; कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Mulund Metro Slab Collapse LBS Road

मुंबई : मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.

अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT