मुलुंड : मुंबईत आगीच्या दुर्घटना सुरूच असून मुलुंडच्या नाहूर गावात एका इमारतीत लागलेल्या आगीपासून वाचण्याच्या प्रयत्नात सातव्या मजल्यावरून पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी येथील साई धाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
धक्कादायक म्हणजे तळमजल्यावर आग लागली असताना भीतीपोटी इमारतीबाहेर पडण्याच्या नादात ही दुर्घटना घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
रामलाल साधुराम यादव (67) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे, परंतु तपास सुरू असून नंतरच खरे कारण स्पष्ट होणार आहे.
बुधवारी सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी येथील साई धाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आठ मजली इमारतीच्या तळ मजल्यावर आग लागली. ही आग इलेक्ट्रिक
मीटर केबिनमधील इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन्स आणि भंगार साहित्यापर्यंत मर्यादित होती. मात्र आग इमारतीत पसरेल या भीतीपोटी रामलाल यांनी सुरक्षीत बाहेर पडण्याच्या धावपळीत े सातव्या मजल्यावरून खाली पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनीमृत घोषित केले.
पालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार ही लेव्हल 1 ची आग होती. (किरकोळ घटना मानली जाते).