शालेय सहलींसाठी आता फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचाच वापर करावा, अशी सक्ती करणारे आदेश शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी जारी केला आहे.  file
मुंबई

MSRTC Buses for School Trips : शालेय सहलींसाठी नवीन एसटी बसेस

राज्यातील 251 आगारांमधून एक हजार बसेस देणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दिवाळीनंतर शालेय सहलींचे नियोजन शाळा करतात. त्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद देण्यासाठी एसटी महामंडळ राज्यातील २५१ आगारांमधून आठशे ते एक हजार बसेस उपलब्ध करून देणार आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान राज्यभरातील विविध शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९,६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा (प्रतिपूर्ती रकमेसह) महसूल प्राप्त झाला होता.

शालेय सहलींसाठी एसटीच्या नवीन बसेसच उपलब्ध करू द्या, अशी सूचना केली आहे. एकूण भाड्यामध्ये ५० टक्के सवलतदेखील दिली जाणार आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख शाळा-महाविद्यालयांत जाऊन याबाबत जनजागृती करत आहेत.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

यंदाही प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा-महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT