Bachchu Kadu Pudhari
मुंबई

MPSC Paper Leak: एमपीएससीच्या अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा; बच्चू कडू यांची मागणी

या पेपरफुटीचा मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न आणि औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आयोगातील तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली.

त्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पेपरफुटीचा मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी आयोगाचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे आणि अवर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक केली आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी कडू यांनी केली आहे. प्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT