शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अखेर आज, सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गेल्या जवळपास आठवडाभरापासून संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खालावल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांनंतर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना आज दुपारी २ वाजता डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत हे त्यांच्या घरी परततील आणि तिथेच बेड रेस्ट घेतील. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी एक निवेदन जारी करून आपली तब्येत ठीक नसल्याने काही दिवस कार्यकर्ते आणि पत्रकारांशी बोलणार नसल्याचे सांगितले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना बेड रेस्ट देण्यात आली आहे.
संजय राऊत यांना जरी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ते काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूरच राहणार आहे. त्यांनी ट्विट करून आपण आता नवीन वर्षात भेटणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं जरी राऊत यांना डिस्चार्ज मिळाला असली तरी ते लगेचच माध्यमांना प्रतिक्रिया देतील. किंवा सकाळची पत्रकार परिषद सुरू करतील याची शक्यता नाही.