मुंबई : Brixton Motorcycles | भारतातील सुपरबाईक क्षेत्रात नवीन पर्व सुरू करत मोटोहाऊस (Kaw Veloce Motors Pvt. Ltd.) ने अलीकडेच ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ (VLF) ब्रँडचे अधिकृत लॉन्च केले आहे. अभिनेते आर. माधवन यांना ब्रिक्स्टन क्रॉमवेल १२०० स्पेशल एडिशनच्या पहिल्या बाईकची मुंबईत डिलिव्हरी करण्यात आली. हा भारतीय बाईकिंग क्षेत्रासाठी एक गौरवशाली क्षण आहे.
ब्रिक्स्टनच्या क्रॉसफायर ५०० एक्ससी (XC) या दमदार मॉडेलने टॉप गियर कडून प्रतिष्ठित ‘लाइफस्टाईल मोटरसायकल ऑफ द इयर’ हा पुरस्कार पटकावला आहे. मोटोहाऊसचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके म्हणाले, "मोटोहाऊस हा केवळ एक व्यवसाय नाही, तर बाईकिंग संस्कृतीला नव्याने घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्रिक्स्टन आणि व्हीएलएफ (VLF) ब्रँडच्या माध्यमातून आम्ही भारतीय बाईक प्रेमींना सर्वोत्तम मोटरसायकल्स आणि तांत्रिक प्रगती देण्याचा प्रयत्न करत आहोत. मोटोहाऊससाठी हा केवळ एक मोठा टप्पा नसून, हा अभिमानास्पद क्षण ठरला आहे. मोटोहाऊस भारतातील बाईकिंग संस्कृतीत नवा आयाम निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे."