मुंबई : राज्याच्या काही भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच सप्टेंबरपर्यंत या भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून, त्याची तीव्रता पुढे वाढणार आहे. त्याच्या प्रभावाने पूर्व, तसेच मध्य भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा कोल्हापूर घाट परिसर, जळगाव, अमरावती जिल्ह्यात, गुरुवारी रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे सातारा, कोल्हापूर, नाशिक घाट परिसर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे घाट, नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो.