मुंबई : मुंबई येथे आयोजित व्याखानात सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी भारत, राजकारण, भाजपा यासह विविध मुद्यांवर भाष्य केले. संघाची वाटचाल, भारताची वाटचाल याविषयी त्यांनी अनेक मुद्दे सविस्तर मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले. जगाने महाशक्ती पाहिल्या आहेत. या महाशक्ती कशा पद्धतीने दंडुके चालवितात हेही जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारताला अशी महाशक्ती बनायचे नाही. तर भारताला विश्वगुरू बनायचे आहे.
मोहन भागवत यांच्या या व्याख्यानाला केवळ 1200 गण मान्य व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन आणि मुख्य संपादक डॉ. योगेश जाधव यांचा समावेश होता. तसेच अभिनेता सलमान खानही या कार्यक्रमाला उपस्थित होता.
तसेच रणबीर कपूर, विख्यात गायिका अनुराधा पौडवाल, तसेच रोनी स्क्रूवाला, विनित जैन, सुभाष चंद्रा, नितेश तिवारी, मोहित सुरी, रमेश तौरानी, बोनी कपूर, ओम राऊत, सुभाष घई, पार्श्वगायक अदनान सामी, दिग्दर्शक विपूल शहा, इंदर कुमार, प्रसाद ओक, आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे, होमीभाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, स्वामी स्वरूपानंद, अक्षत गुप्ता, नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे प्रमुख आशिष चौहान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ज्येष्ठराज जोशी, डॉ. जी. डी. यादव,सनदी अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, डॉ. श्रीकर परदेशी, विवेक भीमनवार अभिनेते प्रसाद ओक, प्रसाद बर्वे, ऋषिकेश जोशी, मनोज जोशी, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. श्रुती सदोलीकर काटकर तसेच इस्त्रायल, इटलीच्या राजदूतावासाचे अधिकारी यांचा समावेश होता
सलमान खानची उपस्थिती कुतूहलाचा विषय
संघ शताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानास अभिनेता सलमान खान याची उपस्थिती कुतुहलाचा विषय ठरला. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपल्या भाषणात सलमानचा उल्लेख केला. 'समाज फॅशननुसार चालतो. चित्रपटात 'सलमान खान'जी जसे कपडे घालतात तसे महाविद्यालयीन तरूण कपडे घालतात. सर्व चांगल्या वाईट बाबींत असे फॅशन चालते. सामान्यांचा ज्यांच्यावर विश्वास असतो, त्यांना जे चांगले वाटतात त्यांचे अनुकरण सामान्य माणूस करत असतो, असे सरसंघचालक म्हणाले.