Mohan Bhagwat Event Celebrities | मोहन भागवतांच्या कार्यक्रमास सलमान, शाहरूख, अंबानी यांच्या उपस्थितीची चर्चा  Pudhari File Photo
मुंबई

Mohan Bhagwat Event Celebrities | मोहन भागवतांच्या कार्यक्रमास सलमान, शाहरूख, अंबानी यांच्या उपस्थितीची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे दोनदिवसीय व्याख्यानाच्या निमित्ताने मुंबईत मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी संघाने सिने अभिनेता शाहरूख, सलमानसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले आहे. सिनेकलाकारांसह क्रीडा, उद्योग, अर्थ आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे समजते. पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात शनिवारी, 7 फेब्रुवारी आणि रविवारी, 8 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. संघाने आर्थिक, न्यायिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, चित्रपटसृष्टी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित केले असल्याचे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, सिने अभिनेता सलमान खान, शाहरूख खान यांच्यासह उद्योजक मुकेश अंबानी, कुमारमंगलम बिर्ला, सचिन तेंडुलकर यांनाही संघाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. शाहरूख आणि सलमान या दोघांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे कळविल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली.

याशिवाय कला क्षेत्रातील आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट जगतातील बोनी कपूर, क्रीडा क्षेत्रातील चिराग शेट्टी, लेखक विश्वास पाटील, चिन्मय मिशनसह अन्य संत परंपरेतील लोक कार्यक्रमाला येणार आहेत. संघ शताब्दी वर्षानिमित्त यापूर्वी देशातील दिल्ली, बंगळूर आणि कोलकाता या महानगरांत असा कार्यक्रम झालेला आहे.

डॉ. योगेश जाधव यांचा निमंत्रितांत समावेश

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या व्याख्यानमालेसाठी संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांची भेट घेऊन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. डॉ. योगेश जाधव यांनी हे निमंत्रण स्वीकारत व्याख्यानमालेत सहभागी होणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT