Modak Sagar overflow
मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या पाच तलावांपैकी ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलाव बुधवारी (दि.९) सकाळी ६.२७ वाजता ओसंडून वाहू लागला. मागील वर्षी २५ जुलैला हा तलाव ओसंडून वाहू लागला होता. यावेळी १६ दिवस अगोदरच तलाव वाहू लागला आहे. दरम्यान, जल अभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.