मोबाईल टॉवरची उभारणी मालकाच्या परवानगीशिवाय नको  Pudhari
मुंबई

मोबाईल टॉवरची उभारणी मालकाच्या परवानगीशिवाय नको

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मोबाईल टॉवर्स उभारण्यासंबंधी २०१३ च्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार शाळा, कॉलेज आणि रुग्णालयांच्या इमारतींच्या टेरेसवर मोबाईल टॉवर उभारण्यास मनाई असल्याने इमारतींच्या टेरेसवरील बेकायदा मोबाईल टॉवर हे धोकादायक आहेत, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईतील कैसर-ए-अमीन इमारतीवरील उभारण्यात आलेला मोबाइल टॉवर हटवण्याचे आदेश रिलायन्स जिओ कंपनीला दिले.

न्या. अयज एस. गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने हे आदेश देताना टॉवर हटविताना पालिका प्रशासनाने रिलायन्स जिओला मदत करावी, जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बंदोबस्त पुरवावा, अशा सूचनाही केल्या. या दणक्यानंतर रिलायन्स जिओ कंपनीने आठवडाभरात टॉवर हटवण्याची हमी दिली. डोंगरी परिसरातील लक्ष्मण नारायण जाधव मार्गावरील कैसर-ए- अमीन बिल्डिंगवर रिलायन्स जिओ इन्फ्राटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या भागीदारीत शौकत अहमद यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मान्यता न घेता उभारण्यात आलेल्या टॉवरला आक्षेप घेत कैसर-ए-अमीन बिल्डिंग टेनंट असोसिएशनने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT