Malad Protest Pudhari
मुंबई

Malad Protest: मैदान वाचवण्यासाठी मनसेचा मालाड पी-पश्चिम कार्यालयावर मोर्चा; पालिका आवारात क्रिकेट खेळून निषेध

मालाड पश्चिममधील सार्वजनिक मैदाने वाचवण्यासाठी मनसेने पी-पश्चिम विभागीय पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. मैदानांचे संरक्षण करून त्यांचा इतर कारणांसाठी वापर थांबवण्याची मागणी.

पुढारी वृत्तसेवा

मालाड: मालाड पश्चिम परिसरातील सार्वजनिक मैदाने वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने सोमवारी पी-पश्चिम विभागीय पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक मैदानांचे संरक्षण करावे आणि मैदानांचा इतर कारणांसाठी वापर होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चादरम्यान मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी पी-पश्चिम कार्यालयाच्या प्रांगणातच क्रिकेट खेळून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

मनसेच्या या आंदोलनामुळे लिबर्टी गार्डन परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सार्वजनिक मैदाने ही नागरिकांसाठी तसेच मुलांच्या खेळासाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यांचे अस्तित्व आणि उपलब्ध क्षेत्र कायम राखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT