मुंबई

PHOTOS : मनसेच्या दणक्यानंतर मलबार हिलमधील ‘ते’ गुजराती बोर्ड BMCने अखेर हटवले

मुंबईत भाषा वाद पुन्हा तापला! मलबार हिल परिसरातून गुजराती आणि जैन नामफलक गायब; पाहा नेमकी काय आहे घटना...

पुढारी वृत्तसेवा

मुंबईत पुन्हा एकदा भाषा वादावरून राजकीय वातावरण तापलंय! निमित्त ठरलंय मुंबईचा अतिशय उच्चभ्रू परिसर असलेल्या मलबार हिलमधील ते वादग्रस्त बोर्ड. मलबार हिलच्या चौका-चौकात लावण्यात आलेले गुजराती आणि जैन भाषेतील नामफलक अखेर महापालिकेनं तडकाफडकी हटवले आहेत. मनसेच्या इशाऱ्यानंतर पालिकेने ही मोठी कारवाई केली आहे. नेमका काय आहे हा संपूर्ण वाद? पाहूयात या ७ फोटोंच्या माध्यमातून...

मलबार हिलमधील ‘ते’ वादग्रस्त गुजराती बोर्ड अखेर हटवले!

मुंबईतील व्हीआयपी परिसर असलेल्या मलबार हिलमधील चौकात लावण्यात आलेले गुजराती आणि जैन भाषेतील नामफलक महापालिकेने तडकाफडकी काढून टाकले आहेत.

मनसेच्या इशाऱ्यानंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये

मलबार हिल परिसरातील चौका-चौकात केवळ गुजराती भाषेला प्राधान्य देणारे फलक लावण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेत पालिकेकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती.

मनसेची नेमकी मागणी काय होती?

महाराष्ट्रात आणि मुंबईत असतानाही स्थानिक भाषेला डावलून गुजराती आणि जैन भाषेतील फलक का लावले? असा सवाल करत मनसेने हे नामफलक त्वरित हटवण्याची मागणी लावून धरली होती.

BMC च्या ‘ए’ विभागाची मोठी कारवाई!

मनसेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ (A) विभाग कार्यालयाने तातडीने पथक पाठवले आणि चौकातील ते वादग्रस्त बोर्ड हटवण्यास सुरुवात केली.

आयपी भागात महापालिकेचा हातोडा!

मलबार हिल हा मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील परिसर मानला जातो. अशा भागात महापालिकेने केलेली ही धडक कारवाई सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरत आहे.

मनसेच्या आंदोलनाला यश; मुंबईकरांकडून स्वागत

फलक हटवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबईत मराठी भाषेचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही यावेळी मनसेकडून देण्यात आला.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या कारवाईनंतर सोशल मीडियावर ‘मराठी पाऊल पडते पुढे’ म्हणत नेटकऱ्यांनी मनसे आणि पालिकेच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. मुंबईतील भाषा वादावर या कारवाईने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT