दक्षिण मुंबई ते ठाणे 25 मिनिटांत pudhari photo
मुंबई

Eastern Freeway widening project : दक्षिण मुंबई ते ठाणे 25 मिनिटांत

पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणेपर्यंतच्या विस्तारीकरणाचे बांधकाम सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणेपर्यंतच्या विस्तारीकरणाचे बांधकाम सुरू केले आहे. एकूण 13.90 किमी लांबीचा, पूर्णपणे उन्नत 6-पदरी अशा या हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या 25-30 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

हा कॉरिडॉर आनंद नगर पासून मुलुंड, ऐरोली, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपरमार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यामुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. हा महामार्ग दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.

ठाण्यात हा प्रकल्प आनंद नगर ते साकेत उड्डाण पुलाशी मुलुंड जकात नाका येथे आणखी एका उन्नत कॉरिडॉरशी सुलभपणे जोडला जाईल, ज्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाशी देखील हा उन्नत मार्ग जोडला जाणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, प्रदूषण कमी होईल तसेच लाखो नागरिकांना अधिक वेगवान, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल, असा दावा केला जात आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक व्यवहारांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

स्थिती अहवाल

  • प्राथमिक सर्व्हेची कामे पूर्ण.

  • टेस्ट पाइल्स पूर्ण.

  • भू-तांत्रिक तपासणी जवळपास पूर्ण.

  • युटिलिटी ओळखण्याचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण.

  • वर्किंग पाइल्स आणि पियर कास्टिंग प्रगतीपथावर.

मुख्य वैशिष्ट्ये

  • 2.5 मीटर व्यासाचे मोनोपाइल्स, मजबूत पीयर्स, 40 मीटर स्पॅन आणि 25 मीटर सिंगल-सेगमेंट सुपर स्ट्रक्चर.

  • मधील उन्नत रस्त्यासाठी पहिल्यांदाच सिंगल पाईल, सिंगल पियर प्रणाली.

  • मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे 2 पदरी अप-डाऊन रॅम्प.

  • नवघर उड्डाणपूल येथे 3+3 पदरी उन्नत टोल प्लाझा.

  • अखंड, सुरक्षित आणि हाय-स्पीड प्रवासासाठी डिझाइन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT