जितेंद्र आव्हाड.  Pudhari Photo
मुंबई

Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने आव्हाड यांना फोन करून, "घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन," अशी थेट धमकी दिली. यानंतर आव्हाड यांनी संबंधित व्यक्तीने पाठवलेला व्हॉट्सॲप मेसेजही आपल्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) खात्यावरून शेअर केला आहे. तसेच त्यांनी एक मोबाईल क्रमांक शेअर करत ट्विटमध्ये म्हटले आहे की, "अज्ञात व्यक्तीने मला किमान दोन ते तीन वेळा फोन केला व अर्वाच्य भाषेत बोलून जीवे मारण्याची धमकी दिली."

या धक्कादायक प्रकारानंतर आव्हाड यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, त्या व्यक्तीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. "आधी जित्याला गोळ्या घालीन, नंतर तुलापण गोळ्या घालीन; घराच्या बाहेर येऊन गेलो आहे," असे त्या व्यक्तीने वाणी यांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT