Navratri Garba Mira Road Mumbai
मुंबई: मिरा रोड येथील गरब्यात अंडी फेकल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जेपी नॉर्थ गार्डन सिटी नावाच्या सोसायटीत ही घटना घडली. नवरात्रीनिमित्त गरबा सुरू असताना, काही समाजकंटकांनी सोळाव्या मजल्यावरून गरब्यावरती अंडी फेकली.
या घटनेनंतर स्थानिक रहिवासी मोहिसीन खान याच्या विरोधात काशिमरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांचा बंदोबस्त असताना हा प्रकार घडला आहे. घटनेनंतर खान यांच्या विरुद्ध शिंदे सेना आक्रमक झालेली आहे. सोसायटीतील काही लोकांनी स्थानिक मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करून घटनेची माहिती दिली.