Mira Bhayandar Zombie drug | मीरा-भाईंदरमध्ये पोहोचले ‘झोंबी’ ड्रग्ज? 
मुंबई

Mira Bhayandar Zombie drug | मीरा-भाईंदरमध्ये पोहोचले ‘झोंबी’ ड्रग्ज?

नेस्को पाठोपाठ नव्या संकटाची चाहूल

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : कर्नाटकचे आयटी शहर बंगळूर, बिहार आणि चंदीगड पाठोपाठ महाराष्ट्रातही ‘झोंबी’ हे ड्रग्ज दाखल झाले की काय, असा भयप्रश्न व्हायरल झालेल्या दोन व्हिडीओंमुळे निर्माण झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये या झोंबी ड्रग्जच्या प्रभावाखाली विचित्र हालचाली करत किंवा स्तब्ध अवस्थेत एकाच ठिकाणी तासनतास उभे असलेल्या दोन तरुणांचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आणि सारेच चिंतेत पडले.

मुंबईत नेस्को सेंटरच्या कॉन्सर्टमध्ये गेल्या शनिवारी एमडी ड्रग्जच्या गोळ्या घेतल्याने एक तरुणी व एका तरुणाचा बळी गेला. त्याचा तपास सुरू असतानाच झोंबीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर बुधवारी फिरू लागले. यातील एक व्हिडीओ भाईंदर पूर्वेकडील 90 फूट रोडवरील असून, दुसरा भाईंदर पश्चिमेकडील बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूचा आहे. झोंबी ड्रग्ज घेतल्यास ती व्यक्ती एकाच ठिकाणी स्तब्ध होते.

या दोन्ही व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळलेली नाही. मात्र, या प्रकाराची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेने तपास सुरू केल्याचे मीरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT