minor girl assault  file photo
मुंबई

Minor girl assault case : नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर मित्राकडूनच अत्याचार

लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः नोकरीच्या आमिषाने एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केला. हॉटेलमध्ये नेताना त्याने तिच्या आधारकार्डमध्ये फेरफार करुन जन्मतारीखेत बदल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मित्राला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

पिडीत मुलगी सतरा वर्षांची असून ती सध्या चेंबूर परिसरात राहते. आरोपी घाटकोपर येथे राहत असून एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. नोकरीच्या आमिषाने जवळीक साधून त्याने तिचे आधारकार्ड घेऊन त्यात तिच्या जन्मतारीखेत फेरफार केले होते. या आधारकार्डवरुन त्याने तिला एका हॉटेलमध्ये आणले होते. तिथेच तिच्यावर त्याने लैगिंक अत्याचार केला.

गेल्या तीन ते चार महिन्यांत त्याने तिच्यावर अनेक वेळा लैगिंक अत्याचार केले होते. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने घडलेला प्रकार पार्कसाईट पोलिसांना सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT