MHADA Lottery Pudhari
मुंबई

Mumbai MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांचं मुंबईत घरांचं स्वप्न भंगणार, 2500 घरांच्या सोडतीत कोणासाठी किती घरे?

upcoming mhada lottery 2026 mumbai location latest news: 2,500 घरांच्या सोडतीत अल्प गटासाठी फक्त 91 घरे; सर्वसामान्यांसाठी घराचे स्वप्न दूर

पुढारी वृत्तसेवा

Mumbai MHADA Lottery 2026 Details In Marathi

मुंबई : नमिता धुरी

म्हाडाच्या बहुप्रतीक्षित मुंबई मंडळ सोडतीची जाहिरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. २ हजार ५०० घरांसाठी काढल्या जाणाऱ्या या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाची निराशा होणार असून अल्प उत्पन्न गटाच्या हातीही फारसे काही लागणार नाही.

म्हाडाने २०२३ साली अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सोडत काढली. त्यानंतर २०२४साली मुंबई मंडळाने काढलेल्या सोडतीतील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाच्या घरांच्या किंमती प्रचंड होत्या. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना घरे घेता आली नाहीत. २०२५ या वर्षात मुंबई मंडळाने सोडत काढली नाही. गेल्या काही सोडतींतील शिल्लक घरे सध्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेद्वारे विकली जात आहेत. यात घर मिळण्याची खात्री असली तरी मोठी अनामत रक्कम आणि कोट्यवधींच्या किंमती यांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना घर घेण्यास फारसा वाव राहिलेला नाही.

यावर्षी 5 हजार घरांची सोडत काढली जाईल, अशी घोषणा म्हाडाने गेल्या वर्षीच केली होती; मात्र पत्राचाळीतील 2 हजार 500 घरांचे बांधकाम सुरू न झाल्याने ती घरे सोडतीतून वगळावी लागली आहेत. आता केवळ 2 हजार 500 घरांची सोडत पुढील महिन्यात काढली जाणार आहे; मात्र अत्यल्प गटासाठी फारशी घरे उपलब्ध नाहीत. अल्प गटातील घरांच्या किंमतीही कोट्यवधींमध्ये आहेत. त्यामुळे ही सोडत मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT