मेन लाईन आणि हर्बर मार्गावर आज मेगाब्लॉक Local File Photo
मुंबई

Mumbai Local Train : मेन लाईन आणि हर्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार (दि.४) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईन आणि हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्ती दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. परिणामी सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यत अप आणि डाउन मार्गावरील लोकल १५ मिनिटे विलंबाने धावतील.

सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत ब्लॉक असणार

हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या लोकल सेवा वेळापत्रकानुसार धावतील. तसेच ब्लॉक दरम्यान पनवेल ते मानखुर्द दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते दुपारी साडे चार वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनने प्रवास करु शकतील.

परेचा आज नाईट ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान आज शनिवार ३ ऑगस्ट रोजी नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री साडे बारा ते पहाटे ४ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत धिम्या मार्गावरील लोकल विरार-वसई रोड ते बोरिवली-गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. दरम्यान काही लोकल रद्द केल्या आहेत. शनिवार नाईट ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT