तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना ३०० जागा उपलब्ध होणार आहेत. Pudhari News Network
मुंबई

Medical Education: राज्यात 'वैद्यकीय'च्या 150 जागा वाढल्या

तिसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना 300 जागा होणार उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आठवडाभरापूर्वी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १५० जागा वाढल्या होत्या. आता पुन्हा १५० जागांना मान्यता मिळाली असून तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना ३०० जागा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पनवेलमधील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १००, तर मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेजमध्ये ५० जागा वाढल्या आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २ हजार ६५० जागा वाढवल्यानंतर आठवडाभरातच वैद्यकीय समुपदेशन समितीकडून (एमसीसी) आणखी २ हजार ३०० जागा वाढविण्यात आल्या आहेत. २ हजार ३०० जागा वाढविल्याबाबत समितीकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. नव्याने वाढविण्यात आलेल्या या जागांमद्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा १५० जागा वाढल्या आहेत. नव्याने झालेल्या जागा वाढीमुळे लांबणीवर पडलेल्या तिसऱ्या फेरीसाठी तब्बल ४ हजार ९५० जागा उपलब्ध झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT