Malad fire incident
मुंबई: मालाड (पूर्व) परिसरातील पठाणवाडी, संजय नगर आणि पिंप्रीपाडा भागात आज (दि.१८) दुपारी १२. ५४ सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीएमसीच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग सुमारे १५ ते २० गाळ्यांपर्यंत (गोदामांपर्यंत) मर्यादित राहिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस, बीएमसीचे वॉर्ड अधिकारी, १०८ रुग्णवाहिका आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या टीम्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन विभागाने दुपारी १ वाजता या आगीला लेव्हल-२ (L-II) म्हणून घोषित केले. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून अधिकाऱ्यांकडून आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.