महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथातून 'गांधी वध' शब्द बदलण्यात आला असून त्याऐवजी 'गांधीजींचा खून' असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. 
मुंबई

Marathi Vishwakosh: महाराष्‍ट्र शासनाच्‍या ग्रंथातून 'गांधी वध' शब्द वगळला

विश्वकोशाच्या चौदाव्या खंडापासून 'गांधी वध' असाच शब्दप्रयोग होता

पुढारी वृत्तसेवा

Marathi Vishwakosh Gandhivadh Changed To Gandhijicha Khun : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथातून 'गांधी वध' शब्द बदलण्यात आला असून त्याऐवजी 'गांधीजींचा खून' असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. रवींद्र शोभणे यांनी दिली. विश्वकोशाच्या चौदाव्या खंडाचे प्रकाशन 1989 साली झाले तेव्हापासून त्यात 'गांधी वध' असाच शब्दप्रयोग होता.

'गांधीवध' शब्द वगळण्‍यासाठी २०२० मध्‍ये याचिकेद्वारे मागणी

विश्वकोशाच्या चौदाव्या खंडाचे प्रकाशन 1989 साली झाले. तेव्हापासून त्यात 'गांधी वध' असाच शब्दप्रयोग होता.मराठी विश्वकोशाच्या चौदाव्या खंडात 'गांधी वध' ऐवजी 'गांधीजींचा खून' असा शब्‍दप्रयोग करावा,अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तूवार, बबनराव नाखले, मराठा सेवा संघाचे शिवश्री मधुकरराव मेहकरे आदींनी विधानसभा अध्यक्षांकडे 30 ऑक्टोबर 2020 रोजी याचिकेद्वारे केली होती.

'गांधीवध' शब्द वगळला

महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथातून 'गांधी वध' शब्द बदलण्यात आला असून त्याऐवजी 'गांधीजींचा खून' असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. कुठल्याही महापुरुषाबद्दल किंवा घटनेबद्दल ती मग कुठल्याही विचारधारेची असो मात्र वस्तुस्थिती पाहूनच योग्य प्रकारे विश्वकोशात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र शोभणे यांनी दिली. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयीचे हे बदल विश्वकोशाच्या डिजिटल आवृत्तीत नमूद असून येत्या एप्रिल पर्यंत मुद्रित आवृत्तीतही राहणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT