Marathi Actress Rescue | देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका Pudhari Photo
मुंबई

Marathi Actress Rescue | देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका

गिरगावातील हॉटेलवर पोलिसांचा छापा; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देह व्यापाराच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका करण्यात आली असून, सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट दलाल म्हणून रंगेहाथ पकडण्यात आला आहे. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगावातील एका हॉटेलमध्ये देह व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून व्यवहाराची खात्री केली. त्यानंतर छापा टाकत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली. यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी असून, ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी अभिनेत्री बंगाली आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका करणारी आहे. दोघींची ओळख पोलिसांनी जाणीवपूर्वक गुप्त ठेवली आहे. त्यांचे संरक्षण आणि तपासाच्या दृष्टीने कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT