मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा अंतरवली सराटीतून बुधवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान जरांगे-पाटील यांना आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या भागांत वाहतूककोंडी होऊ नये म्हणून, वाहतूक विभागाने नियोजन केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी (दि.२७) वाहतूकी बदल केले आहेत. आंदोलकांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे महामार्गावर कोंडी होऊ नये म्हणून पळस्पे–गव्हाणफाटा–पामबीच मार्गे वाशी हा मार्ग त्यांच्या वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
या काळात इतर वाहनांना मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, जेएनपीटी मार्ग, पळस्पे–डि पॉइंट, गव्हाणफाटा परिसर, तसेच वाशी प्लाझा व वाशी रेल्वे स्थानकाजवळून प्रवेश बंदी राहील. हलकी व दुचाकी वाहने मात्र पर्यायी मार्गाने जाऊ शकतील. आपत्कालीन सेवा वाहनांना या बंदीतून सूट दिली आहे. वाहनचालकांनी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी दिलेले पर्यायी मार्ग वापरावेत, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
पळस्पे–गव्हाणफाटा–पामबीचमार्गे वाशी : आंदोलकांच्या वाहनांसाठी राखीव.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग : कोनफाटा व बोर्ले टोलनाका–पळस्पे फाटा दरम्यान बंद.
जेएनपीटी महामार्ग (पळस्पे–अटलसेतू जोड) : अवजड वाहनांसाठी बंद.
पळस्पे फाटा–डि पॉइंट जेएनपीटी मार्ग : आंदोलकांच्या ताफ्यावेळी बंद.
गव्हाणफाटा–किल्ला जंक्शन मार्ग : फक्त आंदोलकांसाठी खुला, इतरांसाठी बंद.
वाशी प्लाझा व वाशी रेल्वे स्थानक परिसर : वाहनांना बंदी.
सीबीडी ते पामबीच मार्ग : आंदोलकांच्या ताफ्यावेळी बंद.
हलकी व दुचाकी वाहने : कळंबोली सर्कलमार्गे पनवेल-शीव महामार्ग, खालापूर–खोपोली मार्ग.
जेएनपीटी मार्गावरील पर्याय : साईगाव, दिघोडे, चिरनेर मार्ग.
वाशीला जाणारे हलके वाहन : पनवेल-शीव महामार्ग व सानपाडा सेवा रस्ता.
सीबीडी परिसरातील वाहतूक : आर्म मार्ग, ठाणे मार्ग.
आपत्कालीन सेवा (रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलिस, जीवनावश्यक सेवा) : नेहमीप्रमाणे सुरू.