Manoj Jarange Patil Press Conference :
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना इशारा दिला. त्यांनी येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रास दिवस आहे. त्यापूर्वी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी अशी मागणी केली.
जर ही मागणी मान्य झाली नाही तर दसऱ्या मेळाव्याला सरकारविरूद्ध भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांचा हा दसरा मेळावा नारायणगड येथे होणार असून तयारीसाठी वेळ नसल्यानं तो कसा होईल याबाबत कल्पना नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. तसंच त्यांनी ज्याला कोणाला या मेळाव्याला यायचं आहे त्यांनी यावं अन् ज्यांना कोणाला जमत नाही त्यांनी येऊ नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
पत्रकार परिषदेत पुढं बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'माझी मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना विनंती आहे. तुम्ही सांगितले होते की गेझेटियर लागू केले आहे. येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्याच्या आगोदर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा. ही प्रमाणपत्रे हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यात यावीत अशी देखील मागणी जरांगे पाटील यांनी केली.
जरांगे म्हणाले, 'तिघांची जी समिती आहे त्या समितीला तातडीने कामाला लावा. नोंदींच्या आधारे हैदराबाद स्टेट जिथंपर्यंत होतं त्या सर्वांना प्रमाणपत्र द्यावे अन्यथा नाईलाजाने मला मोठा निर्णय घ्यावा लागेल.' जरांगेंनी ही विनंती आहे धमकी नाही असं स्पष्ट केलं.
दरम्यान, सरकारच्या जीआर बाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी सध्या काही सांगत नाही. मात्र जर काही इकडे तिकडे झालं तर मग सांगतो असा इशारा देखील दिला. मुख्यमंत्री ओबीसींचं कोणतही नुकसान होऊ देणार नाहीत असं म्हणतात. त्यांचं बरोबर आहे कारण आम्ही ओबीसी आहोत.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळालेलं नाही असं स्पष्ट केल. ते म्हणाले की हे आरक्षण हैदराबाद गॅझेट आहे. मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे असं सांगितलं.
तसंच ओबीसी नेते हाकेंवर देखील मनोज जरांगे यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले की मी त्यांच्यावर काही बोलत नाही. मी त्यांना मोजतच नाही. मराठ्यांनी देखील त्याला मोजू नका, थोडे दिवस माझ्या म्हणण्यानूसार चला असं आवाहन देखील त्यांनी मराठा समाजाला केलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता ते अंतरवली सराटीला जाणार असून तेथून ते नारायण गडावर जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे.