Manoj Jarange Patil Manoj Jarange Patil
मुंबई

Manoj Jarange Patil: मराठ्यांच भगव वादळ मुंबईत धडकलं

Jarange Patil Mumbai protest: मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आज आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.

मोहन कारंडे

Manoj Jarange Patil

मुंबई : मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आज आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांच्यासह मराठ्यांच भगव वादळ आज पाहाटे मुंबईत धडकलं आहे. थोड्याच वेळात जरांगे आझाद मैदानात पोहचतील.

'सरकारच्या हातात असताना न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला', अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी गुरूवारी राज्य सरकारला फटकारले. मुंबईच्या आझाद मैदानावरील मराठा आरक्षणासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मरण्याचीही तयारी ठेवल्याचे स्पष्ट केले होते. एक दिवसाचे उपोषण करायला सांगता, तर एक दिवसात आमच्या मागण्या का मान्य करीत नाही? वारंवार माझ्या समाजाचा, माझा अपमान करतात. कारण मी 'मॅनेज' होत नाही, हे त्यांचे दुःख आहे. छत्रपतींच्या विचारांवर चालणारे सरकार मराठ्यांवर गोळ्या घालणार का हा प्रश्न आहे, असे जरांगे म्हणाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT