Fraud Pudhari
मुंबई

Fraud Case: अजित पवार यांच्या कार्यालयात काम करत असल्याचे सांगून फसवणूक

एसआरए फ्लॅटच्या नावाने घातला बारा जणांना ६५ लाखांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत वरिष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या कार्यालयात काम करत असल्याची बतावणी करुन एका भामट्याने एसआरए फ्लॅटच्या नावाने बाराजणांची सुमारे ६५ लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे.

लतिफ शांतवन राजगुरु असे या भामट्याचे नाव असून तो घाटकोपरचा रहिवाशी आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.

यातील तक्रारदार महिला ताडदेव येथे राहत असून ती एका रुग्णालयात केअर टेकर म्हणून काम करते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत तिची लतिफशी ओळख झाली होती. तिला एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती.

यावेळी लतिफने तिला तो अजीत पवार यांच्या कार्यालयात कामाला असून तिला एसआरएमध्ये स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगितले.

त्याच्याकडे एसआरएचे अपात्र सभासदाचे दोनशेहून अधिक फाईल आले होते. या सर्वांना तो पात्र करुन ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरातील एसआरए इमारतीमध्ये फ्लॅट देणार आहे. फ्लॅटची किंमत पंधरा लाख रुपये असल्याचे सांगून त्याने तिला ती रक्कम लवकरात लवकर जमा करण्याचा सल्ला दिला.

त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्याला २० लाख ६४ हजार तर तिच्या परिचित तिघांनी १५ लाख ५५ हजार असे ३६ लाख १९ हजार रुपये दिले होते. तसेच लतिफने इतर आठजणांकडून एसआरए फ्लॅटसाठी फ्लॅट घेत होते. अशा प्रकारे त्याने बाराजणांकडून ६५ लाख रुपये घेतले, मात्र त्यापैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नाही.

ताडदेव पोलिसांना तपासाचे आदेश

चौकशीनतर तो अजीत पवार यांच्या कार्यालयात काम करत नसल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या कार्यालयात काम करत असल्याचे सांगून त्याने अनेकांना एसआरए फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून गंडा घातला होता.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लतिफ राजगुरु याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून ६५ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ताडदेव पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. लतिफला शोध सुरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT