मालाड: मालवणी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप निवृत्ती कदम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संजय तुकाराम रासकर, पोलीस शिपाई विकास साहेबराव माळी आणि पोलीस शिपाई चालक महेंद्रकुमार शामराव मराळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
मालवणी मोबाईल-१ या गाडीवरील या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्याकडून हफ्ता गोळा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने कर्तव्यावर असतानाच ही कारवाई करण्यात आली. दिपक कदम यांना २६ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले. तसेच संजय रासकर, विकास माळी आणि महेंद्र मराळ या तिघांनाही २६ सप्टेंबर रोजी, सेवेतून निलंबन आदेश देण्यात आले.