मालाडमध्ये विसर्जन मिरवणुकीपूर्वीच 'डीजे'वर कारवाई File Photo
मुंबई

Mumbai News : मालाडमध्ये विसर्जन मिरवणुकीपूर्वीच 'डीजे'वर कारवाई; साऊंड सिस्टीम जप्त

मालवणी पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मालाड : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मालाड पश्चिमेतील खारोडी परिसरात विनापरवाना डीजे वाजविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत डीजे साउंड सिस्टिम जप्त केली.

मालाड पश्चिमेतील अली तलाव, खालचा रोड, शंकर मंदिराजवळील खारोडी परिसरात यंग फायटर सार्वजनिक मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी डीजेचा सेटअप करण्यात आला होता. मात्र, डीजे सुरू करण्यापूर्वीच मालवणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि साउंड सिस्टिम ताब्यात घेतली. मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, जीवन भातकुले तसेच डिटेक्शन टीमने ही कारवाई केली.

गणेश विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन व्हावे, यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. विनापरवाना डीजे किंवा साउंड सिस्टिमचा वापर करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली. या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान विनापरवाना ध्वनिव्यवस्थेविरोधात मालवणी पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT