मालाड : मालवणी गेट क्रमांक ७ येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेली आग बघण्यासाठी उसळलेली गर्दी आणि इन्सॅटमध्ये मृत मुलगा. pudhari photo
मुंबई

Mumbai Fire Accident : मालवणीत फटाक्यांच्या दुकानाला आग; १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

घटनेमुळे संपूर्ण मालवणी परिसरात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ७ येथील भाजी मार्केट परिसरात सोमवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास श्री साई किराणा दुकानात सुरू असलेल्या फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत १६ वर्षीय शहाणावाज नियाज खान याचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मालवणी परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शहाणावाज हा फटाके खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. त्याचवेळी अचानक दुकानाला आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने त्याला दुकानातून बाहेर पडता आले नाही.

दरम्यान, आगीच्या तीव्रतेमुळे दुकानाचे छत कोसळून त्याच्या अंगावर पडले. या भीषण आगीत तो शंभर टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती असून, त्याचा जागीच मृत्यू झाला. त्‍याच्या मृतदेहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा मालवणी परिसरात अनेक ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटण्यात आल्याचे दिसून आले. या दुकानांना अधिकृत परवाने होते का? दुकानांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? असे गंभीर प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, अनधिकृतपणे फटाक्यांची विक्री होत असताना त्याकडे अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष का केलेे? एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT