Accident Pudhari
मुंबई

Malad Accident : मालाडमध्ये भीषण अपघात, बसच्या मागील चाकाखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू

राठोडी पेट्रोल पंपाजवळ थरार

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मालाड (पश्चिम) येथील मार्वे रोडवर राठोडी परिसरातील पेट्रोल पंपासमोर सोमवारी (१२ ऑक्टोबर) दुपारी झालेल्या भीषण बस अपघातात सैफुल वैद्य (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. बसच्या मागील चाकाखाली आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १.३० ते २.३० च्या सुमारास ही घटना घडली. सैफुल वैद्य हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. अपघातानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे मार्वे रोडवरील राठोडी परिसरात काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत मोकळा केला.

या प्रकरणी मालवणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT