Crime News pudhari photo
मुंबई

Mumbai crime : क्लासला जाणार्‍या मुलीचा विनयभंग

मालाड येथील घटना; आरोपीचा शोध सुरु

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: खाजगी क्लासला जाणार्‍या एका चौदा वर्षांच्या मुलीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग करुन पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.

दरम्यान ,मुलीच्या पालकांनी तिच्यासाठी खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. मंगळवारी सायंकाळी ती क्लासला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी क्लासच्या इमारतीमध्ये प्रवेश करतानाच तिच्या मागून एक अज्ञात तरुण आला. काही कळण्यापूर्वीच त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT