महायुतीने आज पत्रकार परिषदेत 'रिपोर्ट कार्ड' सादर केलं  x ccount
मुंबई

'महायुती'ने सादर केलं 'रिपोर्ट कार्ड', त्यात नेमकं आहे तरी काय?

Maharashtra Assembly Polls | कामांचा लेखाजोखा 'महायुती'च्या रिपोर्ट कार्डमध्ये

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. यावेळी सरकारने आपले रिपोर्ट कार्ड -२०२२ सादर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित होते. 'महायुती- काम हिच ओळख' असे टायटल असणारे रिपोर्ट कार्ड या त्रयींनी सादर केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विविध विकासकामे करत आहोत. त्याचा लेखाजोखा २०२२ ते २०२४ पर्यंतच्या रिपोर्ट कार्डमध्ये सादर केल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

यावेळी अजित पवार म्हणाले, अनेक विरोधकांकडून आमच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने सांगितलं जात आहे. पण, या योजना देत असताना निवडणुका जवळ येत असताना कॅबिनेटच्या दोन-तीन बौठकांमध्ये हे निर्णय घेतले गेले. अर्थसंकल्पात विचार करून आम्ही योजना मांडल्या. सर्व घटकांना न्याय देण्याच प्रयत्न आम्ही केला. खात्यात पैसे आल्यानंतर 'पैसे परत जाणार' अशा अफवा पसरवल्या गेल्या. एफडीआय देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक झाली आहे. काहीही बोलून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. म्हणून हे रिपोर्ट कार्ड महायुतीने सादर केले आहे.

अजित पावर म्हणाले - 

अजित पावर पुढे म्हणाले, कष्टकरी, युवा, महिला, शेतकरी सर्व घटकांना, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, उद्योगधंदे, ग्रामीण विकास, क्रीडा, सांस्कृतिक विकास, शासकीय कर्मचारी अशा सर्वांना समाविष्ट करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी घेतलेली मेहनत आणि त्यासाठी आम्ही लेखाजोखा मांडला आहे. या जनतेचे जीवन बदलण्याच्या योजना आहेत. आमच्यावर टीका करण्यात आली. अडीच कोटी मायमाऊलीच्या खात्यात पैसे जमा केले. बहिणींच्या आयुष्यात घडत असलेला बदल काहींना पचनी पडत नाही. योजनांबाबबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला. विरोधकांना सकारात्मक बदल पचनी पडत नाहीये. विरोधकांनी बोलताना तारतम्य ठेवावे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय. आमचं सरकार आलं. आम्ही कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूला मागे टाकलं. पण विरोधक गुजरातचे गुणगान गात आहे. महाराष्ट्रचं पुढे आहे, महाराष्ट्र मागे राहू शकत नाही. कुणी कितीही वल्गना केली तरी काही बिघडणार नाही.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे रिपोर्ट कार्ड संक्षिप्त आहे. विकास कामे एका रिपोर्ट कार्डध्ये मावू शकत नाही. महायुती सरकारने मागील २ वर्षात केलेल्या कामांचे आपण सर्व साक्षीदार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र १ क्रमांकावर आहे. अडीच वर्षाचा कालावधीत सर्व प्रकल्प मुंबईचा कोस्टल हायवे, मेट्रो, अटल सेतू, समृद्धी हायवे, मुंबई-पुणे यांचं हायवे, कारशेड, मिसिंग लिंक करत आहोत, ज्यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी कालावधी कमी होईल.

उद्योग गेले, उद्योग पळवले, असे विरोधक सांगत आहेत. पण गुजरात, कर्नाटक मागे पडलं आहे. आज महाराष्ट्र १ ल्या क्रमांकावर आहे. उद्योजकांना आम्ही रेड कार्पेट दिलं आहे. जे उद्योग आले आहेत, ते वाढत आहेत. गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात उद्योग आले आहेत. लोकांना रोजगार मिळत आहे. विकास, उद्योग, कल्याणकारी योजना आणल्या. हे पाहूनचं विरोधकांची पायाखालची वाळू सरकलीय. काहीही उलटसुलट आरोप करत आहेत.

आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. जनता सामान्य माणूस न राहता सुपरमॅन राहिला पाहिजे. आमच्या सुरमॅनला ताकद द्यायची आहे. म्हणून आम्ही लाडकी बहिण योजना आणली. विरोधक लाच दिली म्हणून कोर्टात गेले. पण, तुम्ही जळत आहात. २ कोटी ५० लाखांचे आमचे टार्गेट होते. आम्ही २ कोटी ३० लाख टार्गेट पूर्ण केलं आहे. आमचा जो पैसे देण्याचा उद्देश आहे तो स्वच्छ आहे. लेक लाडकी लखपती झाली आहे. ज्येष्ठांना तीर्थयात्रा योजना, डीबीटीमधून पैसे, शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना आणल्या. आमच्या तिजोरीवर पहिल्यांदा अधिकार बळिराजाचा आहे. १ रुपयांत पिक विमा देणारे देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे.

हे आमचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. रिपोर्ट कार्ड देणारं हे आमचं पहिलं सरकार आहे. काम केल्याशिवाय रिपोर्ट कार्ड काढता येत नाही. आम्ही कामे केली आहेत म्हणून रिपोर्ट कार्डमध्ये माहिती देता आली. आम्ही या राज्याला पुढे नेऊ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT