मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल स्पष्ट झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्याच्या हलचालींनी वेग घेतला आहे. मुंबईत महायुतीच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक होणार असून त्यादरम्यान विधीमंडळ पक्षाच्या नेत्याचीही निवड होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. यादरम्यान महायुतीच्या तीन्ही पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्र बैठका घेतल्या जाऊ शकतात.
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल स्पष्ट होताच महायुतीच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय महायुतीच्या तीनही पक्षांच्या विजयी आमदारांची स्वतंत्र बैठक होऊ शकते. दरम्यान यावेळी पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावरही निर्णय होऊ शकतो.
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महायुतीतील पक्षांनी आपल्या विजयी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश काढले आहेत. या दरम्यान या सर्व घटक पक्षांच्या आमदारांची स्वतंत्र बैठका पार पडणार आहेत. यानंतर महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची भाजपच्या वरीष्ठांशी एकत्र बैठक होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री पदावर निर्णय घेण्यात येईल. काल झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे.