पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी आज (दि.२६) विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर असल्याचे ठाम जाहीर केले आहे. ते समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याविरोधात शिवाजीनगर- मानखुर्द मतदारसंधातून निवडूक लढविणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे. (maharashtra assembly election 2024)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्याही नावाचा समावेश आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहेत. नवाब मलिक यांनी निवडणूक लढवू नये, अशी समजूत अजित पवारांनी घातली होती. मात्र आपण निवडणूक लढवणार असल्याचे मलिक यांनी आज स्पष्ट केले.
शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून ते समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी ते अर्ज दाखल करणार आहेत. आता नवाब मलिकांच्या निर्णयामुळे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.