विद्यार्थी वाढले, तरी राज्यातील बहुतांश शाळा अद्याप रिकाम्याच File Photo
मुंबई

Education system crisis : विद्यार्थी वाढले, तरी राज्यातील बहुतांश शाळा अद्याप रिकाम्याच

394 शाळा शून्य तर 8 हजार 10हून कमी पटसंख्येच्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवन होन्याळकर

गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिली ते बारावीच्या वर्गांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात हजारोंनी विद्यार्थी वाढले असले तरी, ग्रामीण भागातील शाळांचे चित्र मात्र चिंताजनक आहे. राज्यातील तब्बल 394 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही, तर 8 हजार शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी झाली आहे. यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने शाळा, विद्यार्थीसंख्या, शिक्षक व पायाभूत सुविधा यांची माहिती गोळा करण्यासाठी यू-डायस प्लस ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातील 1 लाख 8 हजार 396 शाळांनी विद्यार्थी नोंदणीसह सर्व माहिती 30 सप्टेंबरपर्यंत भरण्याचे आदेश होते. मात्र अजूनही तब्बल 5 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अपूर्ण असल्याने या नोंदणीसाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

या वर्षी (2025-26) 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झालेल्या नोंदणीच्या आधारे राज्यात एकूण 2 कोटी 11 लाख 86 हजार 943 विद्यार्थी नोंदले गेले आहेत. गतवर्षी (2024-25) याच कालावधीत ही संख्या 2 कोटी 11 लाख 79 हजार 673 होती. म्हणजेच, 7 हजार 270 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

शिवाय, सध्या अपूर्ण नोंदणी असलेल्या 4 लाख 76 हजार 508 विद्यार्थ्यांची भर पुढील काही दिवसांत होणार असल्याने, यंदा लाखोंनी विद्यार्थ्यांची वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्व कठीण होत चालले आहे. यामुळे संचमान्यता केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

30 सप्टेबरच्या पर्यंतच्या अहवालात 394 शाळांत शून्य विद्यार्थी नोंद झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 37, नांदेडमध्ये 16, कोल्हापूरमध्ये 13, सातार्‍यात 13, बीडमध्ये 14, छत्रपती संभाजीनगरमध्ये 15, जालना 3, अहिल्यानगर 13, नाशिक 14, पालघर 19, रायगड 12, रत्नागिरी 24, मुंबई उपनगरात 22, मुंबई शहरात 5, ठाण्यात 15, धुळे 4, हिंगोली 6, परभणी 11, गडचिरोली 3, अमरावती 7, यवतमाळ 9, सांगली 14, लातूर 2, अकोला 9, गोंदिया 4, बुलढाणा 21, नागपूर 23, सोलापूर 8, वाशिम 6 इतक्या शाळा आहेत.

1 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळा

राज्यात 7 हजार 946 शाळा अशा आहेत, ज्याठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या 1 ते 10 दरम्यान आहे. यामध्ये सर्वाधिक रत्नागिरीमध्ये 713, रायगडमध्ये 682, कोल्हापूरमध्ये 317, बीडमध्ये 309, नाशिकमध्ये 142, लातूरमध्ये 141, पालघरमध्ये 124, छत्रपती संभाजीनगरमध्ये 198, अहिल्यानगरमध्ये 179, अमरावतीमध्ये 229, चंद्रपूरमध्ये 202, गडचिरोलीमध्ये 325, बुलढाणा 64, धुळे 53, हिंगोली 61, जलना 132, नांदेड 212, परभणी 98, पुणे 627, रत्नागिरी 906, भंडारा 65, सिंधुदुर्ग 569, वर्धा 134, वाशिम 73, यवतमाळ 228, गोंदिया 69, नागपूर 263, सोलापूर 125, मुंबई उपनगरात 360, मुंबई शहरात 34, सांगलीत 210, ठाण्यात 199 शाळा आहेत.

11 ते 100 पटसंख्या असलेल्या शाळा

राज्यात 52 हजार 573 शाळा अशा आहेत, ज्याठिकाणी 11 ते 100 विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये सर्वाधिक अहिल्यानगरमध्ये 3 हजार 199 नाशिकमध्ये 2 हजार 662, पुण्यात 2 हजार 997, सोलापूरमध्ये 2 हजार 602, नांदेडमध्ये 1 हजार 816, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 हजार 945, रायगडमध्ये 1,914, ठाण्यात 1,663, अमरावतीमध्ये 1,454, कोल्हापूरमध्ये 1,596, चंद्रपूरमध्ये 1,366, बुलढाणा 1,129, यवतमाळ 1,770, सातारा 2,055, सांगली 1,439, पालघर 1,790, धुळे 923, जळगाव 1,916, बीड 2,030, लातूर 1,249, नागपूर 1,968, गडचिरोली 1,136, वर्धा 902, वाशिम 684, गोंदिया 868, रत्नागिरी 1,676, भंडारा 710, सिंधुदुर्ग 891, मुंबई उपनगर 1,616, मुंबई शहर 282, धाराशिव 924, जालना 1,192, परभणी 1,945, हिंगोली 640, अकोला 909 शाळा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT