विधानपरिषदेत बोलताना शिक्ष्रणमंत्री दादा भूसे  (Image source X)
मुंबई

Big Breaking |राज्‍यातील शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने

शिक्षण मंत्री दादा भूसे यांची विधानपरिषदेत घोषणा

Namdev Gharal

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा आज विधानपरिषदेत करण्यात आली. या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाई नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. या निर्णयापासून जे कर्मचारी आता आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील पण त्‍यांची जागा रिक्‍त झाल्‍यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती केले जाणार अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भूसे यांची विधान परिषदेत दिली. ,

पुढे एका प्रश्नाचे उत्तर देताना शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवित आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितले.

विरोधकांकडून जोरदार आक्षेप

दरम्‍यान दादा भुसे यांनी केलेल्‍या घोषणेमुळे विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे अशी मागणी करत विरोधकांकडून हा जोरदार मुद्दा लावून धरला. तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणी केली. अनेक शाळामंध्ये जास्त मुली शाळांमध्ये शिक्षण घेत असतात . त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्‍यामुळे कायमस्‍वरुपी भरती झाली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT