Rain Pudhari Photo
मुंबई

Maharashtra Rain Forecast: आज-उद्या राज्याच्या काही भागांत पाऊस, त्यानंतर उघडीप; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

४ ऑगस्टपासून राज्यातून पाऊस पूर्ण ओसरणार आहे. त्यानंतर १२ ते १४ ऑगस्टनंतरच पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरूच असून कोकण घाटमाथ्यावर दोन दिवस जोर राहणार आहे. मात्र ४ ऑगस्टपासून राज्यातून पाऊस पूर्ण ओसरणार आहे. त्यानंतर १२ ते १४ ऑगस्टनंतरच पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात हलका पाऊस झाला. तसेच राज्याच्या काही भागात हलक्या सरी पडल्या.

गत २४ तासांत झालेला पाऊस

कोकण : माथेरान ७४, वाडा ७०, खालापूर ५७, वाकवली ४७, जव्हार, फोंडा ४६, कर्जत, चिपळूण, राजापूर ३८, मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर १२७, राधानगरी १२६, इगतपुरी ९८, वेल्हे ७९, मराठवाडा : लातूर १३, विदर्भः सावली १८, नरखेड १७, घाटमाथा : कोयना २०५, ताम्हिणी १७०, शिरगाव १५०, दावडी १११, भिरा ८७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT