'मविआ'कडून बदलापूर प्रकरणाचे राजकारण : चित्रा वाघ ANI
मुंबई

Maharashtra Politics |'मविआ'कडून बदलापूर प्रकरणाचे राजकारण : चित्रा वाघ

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत आज (दि.२४) महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. (Maharashtra Politics)

पुण्यात आज (दि.२४) राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह, हाताला काळ्या पट्ट्या बांधून, पुण्यातील पावसाच्या दरम्यान बदलापूरच्या घटनेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. 

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव : चित्रा वाघ

दरम्यान मुंबईत आज (दि.२४) महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलत असताना भाजप महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ बोलताना म्हणाल्या, "बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. पीडित कुटुंबाची मानसिक स्थिती आपण समजू शकतो. परंतु, महाविकास आघाडी या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. आज त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटना दाखवण्यासाठी आणि त्यांनी काय केले हे दाखवण्यासाठी आम्ही आलो आहोत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव आहे, पण जनता त्यांना हे करू देणार नाही. सरकार कृतीत उतरले आहे." 

Badlapur sex assault case : काय आहे प्रकरण?

बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. लैंगिक अत्याचार करणारा नराधम हा शाळेतील कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे नाव अक्षय शिंदे असुन तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या या घृणास्पद कृत्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. २० ऑगस्ट रोजी बदलापूर येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल ९ तास लोकल सेवा ठप्प होती.

दरम्यान बदलापूर लैंगिक अत्याचर प्रकरणी एसआयटीने शाळेवर गुन्हा दाखल केला आहे. विविध ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT