मुंबई : नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलाच्या गुप्तवार्ता विभागाच्या पहिल्याच सहपोलीस आयुक्त बनण्याचा मान आरती सिंह यांना मिळाला आहे. गृह विभागाने ही नियुक्ती जाहीर करतच राज्य पोलीस दलातील 26 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
शुक्रवारी सायंकाळी गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी संबंधित पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करताना काही पोलीस अधिकार्यांना अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती दिली आहे. त्यात अमरावतीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊचे समादेशक राकेश कलासागर यांच्यावर मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तपदीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक पद आता विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून अवनत करण्यात आले आहे. त्या जागी आता सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता हे पद निर्माण करण्यात आले आहे.
शुक्रवारी बदली करण्यात आलेल्यांमध्ये मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांची मुंबईच्या सुरक्षण आणि सुरक्षा विभाग, पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेत, वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. रामकुमार यांची पुण्याच्या महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या संचालक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना यांची उत्तर प्रादेशिक विभागात, पुण्याच्या दक्षिण-पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची नागपूर शहर, नागपूर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय बी. पाटील यांची पुणे शहर, पिंपरी-चिंचवड विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची नागपूर शहर, पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक एस. डी. आव्हाड यांची पिंपरी-पिंचवडच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूरच्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. टी. राठोड यांची अमली पदार्थ विरोधी फास्ट फोर्स, नागपूरच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पी. पी. शेवाळे यांची मुंबई राज्य दहशतवाद विरोधी पथक, पुण्याचे प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ए. एच. चावरिया यांची अमरावती शहर आणि मुंबईच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त विनिता साहू यांची सशस्त्र पोलीस दल-मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
मुंबईच्या मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रसा अक्कानवरु यांची महाराज्य राज्य सुरक्षा महामंडळ, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबईच्या प्रतिबंध विभागाचे पोलीस उपायुक्त अमोघ गावकर यांची पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रशासन विभागाच्या पोलीस महानिरीक्षक, पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रशासन विभागाच्या पोलीस महानिरीक्षक जी. श्रीधर यांची पुण्याच्या पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन विभाग, मुंबई राज्य राखीव पोलीस बल क्रमांक आठचे समादेशक मोक्षदा पाटील यांची मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, अमरावतीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊचे समादेशक राकेश कलासागर यांची मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त, नागपूरच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चारच्या समादेशक प्रियंका नाननवरे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त मुंबई वाहतूक विभाग, राज्याच्या महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सहसंचालक, नवी मुंबई सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेशकुमार मेंगडे यांची नवी मुंबईच्या सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी (बढती देऊन त्याच ठिकाणी बदली) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईच्या विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती, लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय मगर यांची पुणे राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, पुणे बिनतारी विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची मुंबईच्या मध्य विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाण्याचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र दाभाडे यांची नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.