Maharashtra Police News 
मुंबई

Maharashtra Police News: नक्षलविरोधी शौर्याला सलाम! राज्यातील ६१६ पोलिसांना 'विशेष सेवा पदक' जाहीर

गडचिरोली-गोंदियातील खडतर सेवेचा गौरव; नवी मुंबईतील पाच अधिकाऱ्यांसह अनेक जवानांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : गडचिरोली आणि गोंदियासारख्या नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर आणि हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल राज्यातील ६१६ पोलिसांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून 'विशेष सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.१२) रोजी ही घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा समावेश आहे.

या विशेष सेवा पदकाने सन्मानित झालेल्यांमध्ये गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

याशिवाय, नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनीही या खडतर भागात केलेल्या सेवेची दखल घेण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईतील सहायक पोलीस आयुक्त (ACP) अजयकुमार लांडगे आणि मयुर भुजबळ यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

पुरस्काराचे मानकरी ठरलेले काही प्रमुख अधिकारी:

  • निलोत्पल (पोलीस अधीक्षक, गडचिरोली)

  • यतिश देशमुख (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली)

  • सुहास शिंदे (उपविभागीय पोलीस अधीक्षक, ठाणे)

  • अजयकुमार लांडगे (सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

  • मयुर भुजबळ (सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

  • तीन पोलीस उपनिरीक्षक (नवी मुंबई पोलीस आयुक्तालय)

६१६ मध्ये SRPF जवानांचा देखील समावेश

एकूण ६१६ पोलीस कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या या पदकांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानांचाही समावेश आहे. नक्षलग्रस्त भागातील अत्यंत तणावपूर्ण आणि धोकादायक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या शौर्याचा आणि सेवेचा हा गौरव मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT