मुंबई: राज्याच्या कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेला आहे. यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी जळगाव ३७.३, मालेगाव ३७.२ अंशांवर पोहोचले होते.
५ ते ६ ऑक्टोबरदरम्यान राज्यात परतीच्या मान्सूनचे आगमन झाले तर वातावरणात किंचित गारवा निर्माण होऊ शकतो. मात्र, परतीचा मान्सून कमकुवत असण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत जाण्याचे संकेत आहेत.
शुक्रवारचे कमाल तापमान : मालेगाव ३७.२ (२०.८), जळगाव ३७.३ (१८.२), मुंबई ३३ (२७.५), अहिल्यानगर ३५.२ (२१.४), पुणे ३४.२ (२२.५), छत्रपती संभाजीनगर ३६.५ (२२.८), नाशिक ३४.८ (२२.५), कोल्हापूर ३२.७ (२३.६), सोलापूर ३६.८, रत्नागिरी ३४.६, सातारा ३५.२, सांगली ३२.४, परभणी ३५.१ (२१.५), अकोला ३६.५ (२३).