Heatwave Pudhari
मुंबई

Maharashtra October Heat: महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला! मालेगाव ३८.४ अंशांवर, मुंबईसह अनेक शहरांत उकाडा

October heat in Maharashtra: कोकणाला तीव्र उष्णतेचा अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra heatwave news

मुंबई: उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयापासून पूर्व भारतात पाऊस सुरू झाला आहे. मात्र, महाराष्ट्रापासून दक्षिण भारतात ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत आहे. सोमवारी राज्यात मालेगाव येथे ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

परतीच्या मान्सूनने दक्षिण भारतात प्रवेश केल्याने महाराष्ट्रात कोरडे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी मालेगाव, सांताक्रुझसह बहुतांश भागात तापमान ३८ अंशांवर पोहोचले होते.

त्यामुळे कमालीचा उकाडा जाणवत आहे. कोकणाला तीव्र उष्‍णतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

सोमवारचे राज्यातील कमाल तापमान

मालेगाव ३८.४, मुंबई ३६.५, सांताक्रूझ ३८, रत्नागिरी ३८.३, डहाणू ३६.३, पुणे ३५.२, लोहगाव ३५.४, जळगाव ३७.१, कोल्हापूर ३४.१, महाबळेश्वर २७.६, नाशिक ३५, सांगली ३५.४, सातारा ३५.७, सोलापूर ३७.६.

धाराशिव ३५, छत्रपती संभाजीनगर ३६.५, परभणी ३५.९, नांदेड ३६.१, अकोला ३८.१, अमरावती ३८, बुलढाणा ३६.२, ब्रह्मपुरी ३५.६, चंद्रपूर ३६, गोंदिया ३४.८, नागपूर ३५.८, वाशीम ३५, वर्धा ३६.२, यवतमाळ ३७.६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT