Maharashtra Covid Cases (File Photo)
मुंबई

Maharashtra Corona News | कोरोनाचे राज्यात 98 तर मुंबईत 34 नवे रुग्ण

Rising COVID Cases Maharashtra | राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra COVID-19 Cases

मुंबई: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून दैनंदिन रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 98 नवीन रुग्ण आढळले आहेत.

त्यापैकी मुंबईत 34, पुणे महापालिकेत 34, ठाणे महापालिकेत 4, वसई विरार महापालिकेत 1, कल्याण डोंबिवली 2, पुणे जिल्हा 4, पिंपरी चिंचवडमध्ये 10, सातारा 1, सांगली 3, छत्रपती संभाजीनगर 1 अशी महापालिकेत रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी मुंबई शहरात गुरुवार 5 जून रोजी नवीन 4 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 40 वर पोहचला आहे. 5 जून रोजी आर.टी.सी.पी.आर केलेल्यांची संख्या 36 असून आतापर्यंत 249 जणांनी तपासणी केली आहे. आतापर्यंत 16 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या राज्यात एकूण 597 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 548 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 575 रुग्ण आढळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT