पुणे पोर्शे कार प्रकरण File Photo
मुंबई

पुणे पोर्शे कार प्रकरण : पुण्यातील ७० पबचे परवाने रद्द

विधीमंडळात विरोधी पक्ष आक्रमक

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कल्याणनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाला. याला उत्तर देताना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पुण्यातील ७० पबचे परवाने रद्द केले गेले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील पबवर करडी नजर ठेवली जात आहे. (Maharashtra Monsoon Session)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • पुणे पोर्शे कार प्रकरणातील ओरीपवर अपघातादिवशीच गुन्हा दाखल केला.

  • कामात दिरंगाई केल्याबद्दल पोलिसांचेही निलंबनही करण्यात आले.

  • पुण्यातील पबवर करडी नजर ठेवली जात आहे. 

आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.  पुण्यातील कल्याणनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले. या प्रकरणासंबधी लक्षवेधी प्रश्नावर चर्चा झाली. विरोधी पक्ष या प्रकरणावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी बोलत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिले. 

अपघाता दिवशीच आरोपीवर गुन्हा दाखल

पुणे कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातातील अल्पवयीन आरोपी हा १७ वर्षांचा आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्याचदिवशी पोलिसांनी आरोपीवर ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीच्या रक्ताचे नमने घेतल्यानंतर रक्तामध्ये अल्कोहोल नाही लक्षात येताच पुन्हा मुलाचे आणि वडिलांचे डीएनए घेतले. तेव्हा लक्षात आले पहिल्यांदा घेतलेले नमुने हे आरोपीचे नसून ते बदलले आहेत. ३ लाख रुपये घेवून डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलले. त्या संबधित डॉक्टरांना निलंबित केले आहे. 

पुण्यातील ७० पबचे परवाने रद्द

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले," या प्रकरणातील आरोपीच्या वडिलांच्यावरही गुन्हा दाखल केला गेला आहे. कारण, त्यांनी आपला मुलगा अल्पवयीन आहे माहीत असूनही गाडी चालवायला दिली होती आणि तपासात निष्पण झाले आहे की, आरोपी हा कार अत्यंत वेगाने कार चालवत होता. त्याचबरोबर ड्रायव्हरने गुन्ह्याचा आरोप स्वत:वर घ्यावा म्हणून दबाव आणण्यात आला यासाठी आरोपीच्या आजोबांनाही अटक केली आहे. 

अल्पवयीन मुलाच्या तपासणीला पोलिसांनी विलंब लावला. कामात दिरंगाई केल्याबद्दल पोलिसांच निलंबनही करण्यात आले आहे. पुण्यातील ७० पबचे परवाने रद्द केले गेले आहेत. पुण्यातील पबवर करडी नजर ठेवली जात आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT