Monsoon rain updates Maharashtra  pudhari photo
मुंबई

Rain Updates | सांगलीत वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Monsoon rain updates Maharashtra | या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. आज सकाळपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. जाणून घ्या पावसाची अपडेट

मोहन कारंडे

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 19 मदर तेरेसा उद्यान पाण्यात

नवी मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपून काढले. नेरुळ सेक्टर 19 मदर तेरेसा उद्यान पाण्यात गेले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पावसामुळे ठाणे बेलापर मार्गासह, सायन पनवेल महामार्ग, एमआयडीसीतील रस्ते देखील जलयम झाले होते.

सांगलीत वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, वारणा नदी पात्राबाहेर

आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक मार्गावर पाणी

मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले. ही घटना सांडपाणी निःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने घडलेली आहे.

भीमाशंकर परिसरात पावसाचा कहर; भात खाचरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान

भिमाशंकर परिसरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. डोंगरकड्यांवरून येणारे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सातारा : सस्तेवाडी फलटण रस्त्यावर पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक बंद. बाणगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

वडाळा-सीएसएमटी दरम्‍यानची हार्बर मार्गावरील रेल्‍वे वाहतूक सकाळी १०.२५ पासून ठप्प

मस्जिद स्टेशनवर पाणी साचल्यामुळे वडाळा आणि सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळी १०.२५ वाजल्यापासून थांबवण्यात आली आहे.

प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

कृष्णा नदीवरील सांगलीतील चार मोठे बंधारे पाण्याखाली

सांगली : कृष्णा नदीवरील सांगलीतील चार मोठे बंधारे पाण्याखाली : बहे, कसबे डिग्रज, सांगली आणि म्हैसाळ बंधारा पाण्याखाली, सांगलीत कृष्णेच्या पाणीपातळीत आणखीन होणार वाढ

मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील दृश्ये.

पावसाची प्रत्येक बातमी पहा 'पुढारी न्यूज'वर

माटुंगा स्टेशन रेल्वे रूळावर पाणी

मध्य रेल्वेवरील माटुंगा स्टेशन इथे रेल्वे रूळावर पाणी येण्यास सुरूवात झाली आहे. सध्या जलदगती मार्गावरील काही रूळांवर पाणी असले तरी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

पनवेलसह नवी मुंबईला पावसाने झोडपले

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नवी मुंबई, पनवेल परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एमआयडीसी परिसर, घणसोली उड्डाणपूल, सायन-पनवेल महामार्ग जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर तसेच ठीक ठिकाणी पाणी साचले आहे. पनवेल शहरासह नवी मुंबईला पावसाने झोडपले आहे.

मुंबईच्या उपनगरात मुसळधार

मुंबईच्या उपनगरात सकाळपासून मुसळधार सुरू आहे. सकाळपासून काळोक आणि पाऊस दोन्ही एकत्र दिसून येत आहे. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर विले पार्लच्या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Monsoon rain updates Maharashtra |

मुंबई : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. महाराष्ट्रात रविवारी (दि. २५ मे) मान्सून दाखल झाल्यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापत आहे. आज सकाळपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तब्बल दहा दिवस आधी पावसाने राज्यात वर्दी दिली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT