Maharashtra Interim Budget 2024
अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडताना  Pudhari Photo
मुंबई

'माझी लाडकी बहीण'| महिलांना दर महा १५०० रुपये; पात्रता आणि अर्ज कसा करावा?

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.२८) राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2024) सादर केला. त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2024) सादर केला. यावेळी त्यांनी महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचीही घोषणा केली आहे.

काय आहे माझी लाडकी बहीण योजना?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. जुलै २०२४ पासून ही योजना सुरु होणार आहे.

कोण करु शकते अर्ज ?

ज्या कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखापेक्षा कमी आहे, त्या कुटूंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT